शिनगारे कुटुंबियांकडून शालेय विद्यार्थ्यांना अमृत महोत्सव दिनामित्त ड्रेसचे वाटप
जत/प्रतिनिधी:- स्वातंत्र्याचा ७५व्या अमृत महोत्सव  दिनामित्त द फ्रेंड्स असोसिएशन जत संचलित बाल विद्यामंदिर जत येथे हुशार, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना सागर तानाजी शिनगारे व डॉ. सौ रूपाली सागर शिनगारे यांच्या कडून शाळेचे ड्रेसचे वाटप करण्यात आले. समाजापुढे एक आदर्श निर्माण करणारे काम शिनगारे कुटुंबीयांनी केले असल्याचे गौरवोद्गार संस्थेचे चेअरमन जि.बी. ऐनापुरे यांनी केले.
        यावेळी संस्थेचे सेक्रेटरी डॉ.एस.वाय. तंगडी, खजिनदार डी. व्ही.पोतदार, संचालक जी.एस. बिज्जरगी, संस्थेचे सभासद  जी.एस. हत्ती, पी.डी. जाधव, सौ.डॉ. व्ही. एस.तंगडी,श्री.ए.पी.कोळी, हुजरे, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका  सौ.एस.बी.कणसे व पूर्व प्राथमिक विभागाचे मुख्याद्यापिका श्रीमती आलबाळ डी.पी. व सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संस्थेतर्फे शिनगारे कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments