जत येथे जेष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्नजत/प्रतिनिधी:-  जत येथे महाराष्ट्र परिट धोबी सेवा मंडळ सांगली व संत गाडगेबाबा परिट समाज जत यांच्या संयुक्त विद्यमाने जत येथील दत्त मंदिर येथे गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज (चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती) तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहर साळुंखे, सांगली जिल्हा अध्यक्ष व प्रदेश उपाध्यक्ष वधु वर सुचक यांच्या उपस्थितीत संत गाडगेबाबा यांचे प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
        यावेळी प्रथमतः समाजातील जेष्ठ नागरिक चंद्रशेखर परीट व हनुमंत साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर जत तालुक्यातील परिट समाजामध्ये दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शिल्ड व प्रमाणपत्र देऊन तसेच वह्या व पेनचे वाटप करून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविक भाषणाने करण्यात आली. भारत गायकवाड यांनी जत तालुक्यातील परीट समाजाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या कार्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणातून केला. त्यानंतर जिल्हा कार्यकारणी मधील उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
        यावेळी बोलताना तुकाराम बाबा महाराज यांनी संत बागडेबाबा व गाडगेबाबा या महान संतांनी केलेल्या कार्याचा आदर्श सर्वांच्या समोर मांडला. व त्यांनी सांगितलेल्या दिशेने आम्ही सर्व समाज बांधवांनी वाटचाल करावी असा उपदेश केला. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहर साळुंखे यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शहाजी साळुंखे यांनी केले व आभार संजय साळुंखे यांनी मानले. या कार्यक्रमाला सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातून शेकडो समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments