सौ.माया आदाटे यांनी जत येथील मतिमंद मुलांच्या शाळेत वाढदिवस केला साजरा


जत/प्रतिनिधी:- सामाजिक बांधिलकी जपत व अनावश्यक खर्चाला फाटा देत येथील सौ.माया कैलास आदाटे यांनी आपला वाढदिवस वेलफेअर असोसिएशॅन फाॅर दि डिसेबल्ड मिरज संचलित निवासी मतिमंद मुलांची शाळा जत येथे साजरा केला. यावेळी शाळेतील विद्यार्थी निहाल मुबारक पठाण याचाही वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
        आरपीआय महिला तालुकाध्यक्ष सौ.माया कैलास आदाटे व निहाल पठाण यांचा वाढदिवस एकत्रित साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत होते.
यावेळी सौ आदाटे यांचा शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, प्रत्येक वर्षी माझा वाढदिवस येथेच साजरा केला जातो. त्यामुळे यातून मिळणारा आनंद हा इतर कोणत्याही गोष्टींमध्ये मिळत नाही. शाळेतील विद्यार्थांची शिस्त व स्वच्छता बघुन आंनद झाला.
        या कार्यक्रमासाठी निहाल चे पालक मुबारक पठाण व सौ.आऐशा पठाण हे उपस्थित होते. यावेळी शाळेत निहालचा वाढदिवस साजरा करुन विद्यार्थांना खाऊचे वाटप केल्याबद्दल निहालच्या पालकांनी आदाटे ताई यांचे मनपुर्वक आभार मानले. यावेळी श्री कैलास अदाटे, शाळेचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

तसेच यावेळी माता आदिशक्ती सेवाभावी संस्थेच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने सौ. माया आदाटे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या:-

Post a Comment

0 Comments