आमगोंडा पांढरे "एक्सलंट टीचर ऑवर्डने" सन्मानित

आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल आमगोंडा पांढरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले

जत/प्रतिनिधी:- भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमानिमित्त नामांकित एक्सलंट ग्रुप ऑफ इंटयुट्युशन विजयपूर यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या  " एक्सलंट टीचर ऑवर्ड"  हा पुरस्कार  सोनलगी ता जत येथिल आदर्श शिक्षक आमगोंडा पांढरे यांना देण्यात आला. त्यांचे बालगाव आश्रमाचे परमपुज्य  डॉ. अमृतानंद स्वामीजी व एक्सलंटचे चेअरमन बसवराज कौलगी यांच्याहस्ते मानपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. यानिमित्ताने विजयपूरसह जत तालुक्यातून   त्यांच्यावर अभिनंदनाच्या वर्षाव होत आहे.
        देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यानिमित्त एक्सलंट ग्रुप ऑफ इंटयुट्युशन विजयपूर यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या व मानाचा समजल्या जाणाऱ्या  " एक्सलंट टीचर ऑवर्डने"  संपूर्ण कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील सुमारे पंचवीस विशेष शिक्षकांचा एक्सलंट आदर्श शिक्षक म्हणून गौरविण्यात आले.ज्या ज्या शिक्षकांनी मुलांना शिकण्यासाठी आणि उत्कृष्ट व्यक्ती होण्यासाठी, जे प्रेरणादाई कार्य केले आहे. त्यांच्या योग्य समर्पणाबद्दल त्यांना मानाचा”  एक्सलंट आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२” देण्यात आला आहे.
        यामध्ये जत तालुक्यातील सोनलगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुडडोगी वस्ती शाळेचे आमगोंडा पांढरे यांनाही हा पुरस्कार मिळाला असल्याने विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आमगोंडा पांढरे हे मनमिळावू उत्तम, विद्यार्थीप्रिय, शांत संयमी  शिक्षक म्हणून सध्या कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनातून उत्तम विद्यार्थी घडविले आहेत.  आदर्श पद्धतीने त्यांनी आपली शिक्षकी पेशा सांभाळत आपली शाळेतील जबाबदारी उत्तमरित्या सांभाळली आहे.
         आजअखेर त्यांनी केलेल्या सेवेत त्यांनी शाळा आणि विध्यार्त्यांसाठी विविध आणि विशेष उपक्रम राबवत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यावर भर दिला असून विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. सामाजिक कार्यात सदैव तत्पर राहून सामाजिक कार्यातही त्यांनी आपले योगदान दिले आहे.
          यावेळी डॉ अमृतानंद स्वामीजी व  संस्थेचे चेअरमन बसवराज कौलगी, संचालक राजशेखर कौलगी, मंजुनाथ कौलगी, प्राचार्य डी एल बनसोडे, अशोक बरडोल सावकार, सेवानिवृत्त शिक्षक आर डी सातपुते, काष्ट्राईब शिक्षक संघटनेचे विभागीय कार्याध्यक्ष  लखन होनमोरे यांच्यासह सांगली शिक्षक बँक संचालक गांधी चौगुले, शिक्षक नेते  मलकारी होनमोरे, डी के चव्हाण, राजेश झळकी, चंद्रशेखर कारकल यांनी आपल्या मनोगतातून   आमगोंडा पांढरे यांना सांगली जिल्हा शिक्षक संघ व जत तालुका शिक्षक संघाकडून अभिनंदन करून पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments