नवोन्मेष साहित्य पुरस्काराने प्रा. राजेश भोजने सन्मानित

प्रा.राजेश भोजने यांचा नवोन्मेष पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते  गौरविण्यात आले

जत/प्रतिनिधी:- श्री विजय विठ्ठल हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज सोन्याळ ता जत येथील प्रा.राजेश गोपाळ भोजने याना माहाराष्ट्र साहित्य परिषद दामाजीनगर शाखेने ज्येष्ठ साहित्यिक सुनिल शिनखेडे यांच्याहस्ते वासुदेव मेरू स्मृतीनिमित्त मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन नवोउन्मेष  साहित्य  पुरस्काराने  गौरविण्यात आले.
        यावेळी साहित्यिक सुनील शिनखेडे म्हणाले, अभिव्यक्तिवर बंधने येत असताना  महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजीनगर शाखा विविध उपक्रमांतुन साहित्यिकांना नैतिक बळ देतानाच दर्जेदार साहित्य वाचकांसमोर आणून वाचकांची अभिरुची जोपासते आहे.अनेकविध कार्यक्रम राबवून  ग्रामीण भागात  साहित्य चळवळ गतिमान करीत आहे.यंदा महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातुन लक्षवेधी साहित्य पुरस्कारासाठी निवडून या शाखेने निस्पृह साहीत्य प्रेमींची प्रचिती दिली आहे. ती अभिनंदनीय आहे असे मत जेष्ठ साहित्यिक  सुनील शिनखेडे यांनी व्यक्त केले.त्यांच्या हस्ते मासाप दामाजीनगर शाखेचे पुस्तक पुरस्कार 2021चे वितरण करण्यात आले.
       यावेळी वासुदेव मेरू स्मृती पुरस्कार प्रा,राजेश भोजने याना नवोउन्मेष  साहित्य  पुरस्कार प्रदान करण्यात आला.लक्ष्मीबाई भास्कर जोशी स्मृती पुरस्कार प्रा,डॉ,महेश खरात यांच्या बुर्गट  कादंबरीस मिळाला,मारुतीराव पंडित पुरस्कार प्रा,डॉ,प्रतिभा जाधव  यांना अस्वस्थतेची डायरी  सिद्धमाला ढगे स्मृतीपुरस्कार डॉ, भास्कर बडे याना बाईचा दगड  या कथासंग्रहास मिळाला इंदुमती जडे स्मृती पुरस्कार  डॉ,राजेंद्र माने यांच्या आठवणीच्या पारंब्या ललित लेखसंग्रह,जोती जाधव स्मृती पुरस्कार प्रा,डॉ,तुकाराम रोगटे  कृष्णा यादव स्मृती पुरस्कार डॉ,स्मिता पाटील यांच्या नाही गिरवत येत कुठलीच लिपी या कवितासंग्रहास मिळाला मस्जि शिवशरण स्मृती पुरस्कार प्रा,डॉ,ज्योती कदम यांना  सारे कोठे आलबेल आहे या कवितासंग्रहास आणि  कलावती वाकळे स्मृती पुरस्कार पद्माकर कुलकर्णी ,साहित्यप्रेमी पुरस्कार खेडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
        या समारंभाचे प्रास्ताविक करताना शाखा अध्यक्ष प्रकाश जडे यानी शाखेच्या कार्याचा आढावा घेताना भविष्यातही असेच अनेकविध उपक्रम राबवणार असल्याचे सांगुन आपल्या सहकाऱ्यां विषयी गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बालाजी शिंदे यानी केले तर आभार अशपाक काझी यानी मानले. श्री.व सौ. काशिद यानी पसायदानाने समारंभाची सांगता केली.
      यावेळी दिगंबर भगरे, डॉ. प्रीती शिर्के, श्रीमती ठोंबरे, पोपट महामुरे, राकेश गायकवाड, प्रा.कल्पेश कांबळे, माणिक गुंगे, महेश ढेकळे, डॉ.प्रशांत ठाकरे, छाया मडके, इंद्रजित चव्हाण, माचणवार, श्रीयश सलगर, प्रा. विश्वनाथ ढेपे, सचिन गालफाडे, उमा चव्हाण, बाबासाहेब दत्त, सारीका सुर्यवंशी आदी साहित्यिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments