जत येथील मतिमंद मुलांच्या शाळेत अमृत महोत्सवी स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा


जत/प्रतिनिधी:- येथिल वेलफेअर असोसिएशॅन फाॅर दि डिसेबल्ड मिरज संचलित निवासी मतिमंद शाळा जत येथे अमृत महोत्सवी स्वतंत्र दिन व हर घर तिरंगा या योजनेअंतर्गत दिनांक १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी दि. १४ ऑगस्ट रोजी असोसिएशॅन ऑफ क्लिनिकल लॅबोरेटरी अँनालिस्टस अँड प्राॅक्टीशनर्स या संघटनेचे सदस्य एच.एच. इंडीकर सर हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक शरद कुलकर्णी सर उपस्थित होते.
         यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासुन मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी इंडीकर सर बोलताना म्हणाले की, मुलांची स्वच्छता, शिस्त व शांतता बघुन आंनद झाला. आज मला मतिमंद शाळेत ध्वजारोणानाची संधी व माझा मान-सन्मान केल्याबद्दल संस्था व शाळेचा मि आभारी आहे.
       यावेळी क्लिनिकल लॅबोरेटरी अँनालिस्टस अँड प्राॅक्टीशनर्स या संघटनेचे सदस्य करण पाटील, रमेश मनगुळी, दिलीप व्हनखंडे तसेच जत मधील अनिल कुलकर्णी व राजेश करजगी यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments