लोहगाव येथे घर फोडून २ लाखाचा ऐवज लंपासजत/प्रतिनिधी:- लोहगाव (ता. जत) येथे विमल धोंडीराम कोडग याचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख ५ हजार ७०० रुपयेचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे.
        याबाबत अधिक माहिती अशी की, विमल धोंडीराम कोडग याच्या पतीचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. काही अंतरावर त्याचा मुलगा राहत असून विमल कोडग यांना ताप आल्याने त्या आपल्या मुलाच्या घरी झोपण्यासाठी गेल्या होत्या. याचा फायदा अज्ञात चोरट्यांनी घेत विमल कोडग याच्या घराचा दरवाजा फोडून घरात प्रवेश केला .व घरातील कपाट तोडून कपाटातील मंगळसूत्र दीड तोळे, भोरमळ दीड तोळे, कानातील अर्था तोळे, जुपक्के, पाच ग्राम वेल व चांदीचे दागिने ,जोडवी १० भार असा ऐवज लंपास केला आहे. असा एकूण २ लाख ५ हजार ७०० रुपयेचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. विमल ह्या पहाटे घरी गेल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. याबाबतची फिर्याद जत पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लवटे करत आहेत.

Post a Comment

0 Comments