जत येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न


जत/प्रतिनिधी:- जत येथील श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या २००४ च्या इयत्ता दहावी अ विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी मेळावा नुकताच मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. मेळाव्यानिमित्ताने शाळेतील प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. जत शेगाव रोडवरील चिंच विसावा या निसर्गरम्य ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या ठिकाणी हे सर्व बालसवंगडी एकत्र आले होते व जुन्या आठवणींना उजाळा मिळाला व सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉक्टर, इंजिनियर, पत्रकारापासून ते सर्वसामान्य मजूर ही या मेळाव्यात सहभागी झाले होते. यावेळी मुख्याध्यापक शिंदे सर, सोनवणे सर, करे सर व शिपाई यांचा सत्कार संयोजकांकडून करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन पत्रकार आसिफ सय्यद, अभियंता अभिजीत माने पाटील, डॉ. अनिकेत मलाबादी यांनी केले. शाळेतील आठवणींना उजाळा देत जतच्या श्री रामराव विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.
        २००४ च्या म्हणजेच १८ वर्षांपूर्वीच्या १० वी अ शाळेचे माजी विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी झाले होते. मेळाव्याच्या निमित्ताने परत एकदा एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले होते. 'प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे, हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होता. वर्ग मित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता. शाळेचे विद्यार्थी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी गव्हरमेंट कॉन्ट्रॅक्टर प्रतिक लाड, अभियंता सागर नागरगोजे, मिरज पोलिस श्रीमंत करे, ओंकार तिल्याळकर, डॉ. अभय पाटील, डॉ. प्रशांत चिकोडी, परशुराम पिसाळ, प्रदीप जवळगी, योगेश भोसले, संदीप देवकर, सुशांत सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर माजी विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी उच्चपदावर कार्यरत असलेले माजी विद्यार्थी या सर्वांचा स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments