जत येथील निवासी मतिमंद शाळेत रक्षाबंधन उत्साहात साजरा
जत/प्रतिनिधी:- येथील वेलफेअर असोसिएशन फाॅर दि डिसेबल्ड संचलित निवासी मतिमंद मुलांची शाळा जत येथे माजी जि.प.अध्यक्ष सांगली रेश्माक्का होर्तिकर व सुरेखा होर्तिकर मॅडम यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देऊन विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना राखी बांधून त्यांचे औक्षण केले. यावेळी सर्वांच्या गोड जेवणाचीही व्यवस्था केली होती.
       रेश्माक्का होर्तिकर मॅडम त्यांनी स्वतः आपल्या हातून विद्यार्थ्यांना जेवण भरवले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. यावेळी बोलताना असं म्हणाले की ,आज रक्षाबंधन निमित्त मतिमंद मुलांच्या चेहऱ्यावरील आंनद बघुन खुप आंनद झाला. या शाळेतील विद्यार्थांची स्वच्छाता, शिस्त व अभ्यास बघुन आंनद झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी पानस्कर तसेच स्वागत व आभार शाळेचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर यांनी केले. यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments