शेड्याळ येथील जाळपोळ प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी; बसपाच्या वतीने निवेदनजत/प्रतिनिधी:- तालुक्यातील शेड्याळ येथील आदिवासी पारधी समाजातील युवकाला गावातील काही जातीयवादी लोकांनी किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केली व घरामध्ये जाळपोळ केली. यामध्ये तीन युवकांना गंभीर मारहाण झाली असून, त्यामधील एका तरुणाची प्रकृती गंभीर आहे. सदर गुन्ह्याशी संबंधित सर्व आरोपीवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंद होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी जत यांच्याकडे देण्यात आले. तसेच पीडित कुटुंबास पोलीस संरक्षण द्यावे पीडित कुटुंबाला योग्य न्याय मिळवून द्यावा. अन्यथा बहुजन समाज पार्टीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा बहुजन समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष तानाजी व्हनखंडे यांनी दिला. 
        यावेळी बहुजन समाज पार्टीचे शहराध्यक्ष सुनील कँतन, शहर उपाध्यक्ष श्रीकांत सोनवणे, महासचिव दीपक कांबळे, युवा नेते महेश कांबळे, राकेश कांबळे, विशाल कांबळे, संतोष साबळे, शरद शिवशरण, जकाप्पा सर्जे, आदीजन उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments