अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करूया; आ. सावंतजत/प्रतिनिधी:- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या दिमाखात साजरा करूया, असे आवाहन आमदार विक्रमसिंह सावंत यांनी व्यक्त केले. ते जत येथील एसआरव्हीएम हायस्कूल येथे शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी शहरातून काढलेल्या रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन भारतमाता की जय च्या घोषणा दिल्या.
        आ. विक्रमसिंह सावंत म्हणाले की, 'हर घर तिरंगा' मोहीम जत तालक्यात प्रभावीपणे राबूया, याकरिता सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. देश स्वातंत्र्य होण्यासाठी अनेक क्रांतिकाऱ्यांनी बलिदान दिले असून त्यांच्या स्मृति जतन करणे गरजेचे आहे. निरनिराळे कार्यक्रम साजरे करून त्यांना आदरांजली वाहिल्यासारखे होईल, असे आ. विक्रमसिंह सावंत शेवटी म्हणाले.
          यावेळी प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी दिनकर खरात, एस. आर. एम. हायस्कूलचे प्राचार्य एस. एन. शिंदे, एपीआय राजेश्वरी गायकवाड, संभाजी कोडग यांच्यासह विविध शाळेचे मुख्याध्यापक शाळकरी विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments