थोर व्याख्याते प्रा.सुकुमार कांबळे यांची जत तालुका ओबीसी कार्यालयास सदिच्छा भेटजत/प्रतिनिधी:- थोर व्याख्याते प्रा. सुकुमार कांबळे  यांनी जत तालुका ओबीसी कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी ओबीसी कार्यालयामार्फत चालविण्यात येत असलेले समाज प्रबोधन, उपक्रम व कार्याची माहिती करुन घेऊन काही सुचना केल्या. जत तालुका ओबीसी कार्यालयामार्फत सुरु असलेल्या उपक्रमाचे कौतुक करून प्रोत्साहन दिले.
       यावेळी नगरसेवक भूपेंद्र कांबळे, अविनाश वाघमारे, आदिवासी पारधी समाजाचे नेते बसवराज चव्हाण, इंद्रजित वाघमारे आदी उपस्थित होते. तर उपस्थिताना ओबीसी कार्यालयकडून आण्णाभाऊ साठे लिखित बुध्दाची शपथ, महात्मा फुले लिखित ब्राम्हणाचे कसब, गुलामगिरी, आण्णाभाऊ साठे चरित्र इ.पुस्तके भेट देऊन उपस्थितांचे स्वागत तुकाराम माळी आणि रवींद्र सोलनकर यांनी केले. तर आभार इंजिनिअर मुबारक नदाफ यांनी माणले.

Post a Comment

0 Comments