स्व.बी.आर (काका) शिंदे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजनजत/प्रतिनिधी:- लोकनेते स्व.बी.आर (काका) शिंदे यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दि.८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता अनुकांचन, विजय कॉलनी, सातारा रोड जत येथे करण्यात आल्याची माहिती जत तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुजय उर्फ नाना शिंदे यांनी दिली.
        या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रमोद पोतनीस सर व डॉक्टर मनोहर मोदी हे उपस्थित राहणार आहेत. तसेच स्वर साधना कोल्हापूर प्रस्तुत आठवण - भावगीत/भक्तीगीत या कार्यक्रमांचे आयोजन संयोजकांकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments