मुक्ती पर्व - आत्मिक स्वातंत्र्याचे पर्व केवळ ब्रह्मज्ञान प्राप्त होणे ही मुक्ती नसून क्षणोक्षणी त्यानुसार जीवन जगणे ही मुक्ती होय- सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज ‘‘ब्रह्मज्ञानाला जीवनाचा आधार करुन निराकार प्रभुशी जोडून राहणे आणि क्षणोक्षणी त्याचे स्मरण करत सेवाभाव धारण करुन जीवन जगणे ही खरी भक्ती होय. पुरातन संतांचे व भक्तांचे जीवनदेखील ब्रह्मज्ञानाशी जोडल्यानेच सार्थक ठरले आहे.’’ असे उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांनी ‘मुक्ति पर्व’ समागमाच्या कार्यक्रमात लाखोंच्या संख्येने उपस्थित लाखों विशाल जनसमुदायाला संबोधित करताना व्यक्त केले. आपले आशीर्वाद प्रदान करताना त्यांनी प्रतिपादन केले, की ‘‘केवळ ब्रह्मज्ञान प्राप्त होणे ही मुक्ती नसून त्यानुसार क्षणोक्षणी जीवन जगणे ही खरी मुक्ती होय.’’ अशी अवस्था निराकार ईश्वराला मनामध्ये धारण करुन त्याच्या रंगामध्ये रंगून जाण्यानेच प्राप्त होऊ शकते. कारण ब्रह्मज्ञानाद्वारे लाभलेल्या दिव्य चक्षूंनी जीवनाची दशा व दिशा  एकरस होऊ जाते. 
जीवनातील आत्मिक स्वातंत्र्याचे महत्व एका उदाहरणाद्वारे समजावताना सद्गुरु माताजींनी सांगितले, की ज्याप्रमाणे कोणत्याही कारणाने शरीर आखडले गेले असेल तर त्यातून आपण लवकरात लवकर मोकळे होऊ इच्छितो तद्वत आपला आत्मा अनेक जन्मांपासून शरीराच्या बंधनामध्ये जखडलेला आहे आणि त्याची मुक्तता केवळ निराकार ईश्वराला जाणण्यानेच शक्य आहे. जेव्हा आपण आपल्या निजघराला जाणून घेतो तेव्हा आमच्या आत्म्याला मुक्त अवस्था प्राप्त होते. ब्रह्मज्ञानाच्या दिव्य प्रकाशाने मनामध्ये साठलेले समस्त नकारात्मक भाव लयाला जातात आणि आपण भयमुक्त जीवन जगू लागतो ज्यायोगे आमचा इहलोक सुगम आणि परलोक सोपा होऊन जातो. ब्रह्मज्ञानाद्वारे कर्मबंधनातुन मुक्ती शक्य आहे कारण त्यायोगे आपण प्रभु इच्छेमध्ये राहायला शिकतो. आपल्या जीवनाचा प्रत्येक पैलू हा आमच्या विचारांवर अवलंबून आहे. एखाद्या कार्यात यश मिळेल अथवा अपयश मिळेल याबद्दल आपण चिंतित असतो; परंतु निराकार प्रभुचा आसरा घेतल्याने आपली ही चिंता मिटून जाते. 
संत निरंकारी मिशनमार्फत दरवर्षी 15 ऑगस्ट, अर्थात् स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी संत ‘मुक्ति पर्व’ दिवस साजरा केला जातो. एका बाजुला परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्त करणाऱ्या भारतीय स्वातंत्र्य सेनानिंना नमन केले जाते तर दुसऱ्या बाजुला आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून प्रत्येक जिवात्म्याला सत्य ज्ञानाच्या दिव्य ज्योतीशी अवगत करणाऱ्या दिव्य विभूती शहनशाह बाबा अवतारसिंहजी, जगतमाता बुद्धवंतीजी, निरंकारी राजमाता कुलवंत कौरजी, सद्गुरु माता संविदर हरदेवजी व अन्य भक्तांना श्रद्धा सुमने अर्पित करत त्यांच्या जीवनातून प्रेरणा प्राप्त केली जाते. 
15 ऑगस्ट, 1964 पासूनच हा दिवस जगतमाता बुद्धवंतीजी आणि त्यानंतर 1970 पासून शहनशाह बाबा अवतारसिंहजी यांच्या दिव्य जीवनांना समर्पित राहिला शहनशाह बाबा अवतारसिंहजी यांनी संत निरंकारी मिशनची रूपरेखा तयार केली. त्यांच्या महत्वपूर्ण उपलब्धींबद्दल निरंकारी जगत त्यांचे सदैव ऋणी राहील. सन 1979 मध्ये संत निरंकारी मंडळाचे के पहिले प्रधान लाभसिंहजी यांनी जेव्हा आपल्या नश्वर देहाचा त्याग केला तेव्हा बाबा गुरबचनसिंहजी यांनी या ‘मुक्ति पर्व’ असे नाव दिले. ममतेची दिव्य मूर्ती निरंकारी राजमाता कुलवंत कौरजी यांनी आपले महान कर्म आणि दृढ विश्वासाने मिशनचा दिव्य संदेश सर्वदूर जनसामान्यांपर्यंत पोहचविला. त्यांनीही ऑगस्ट महिन्यातच आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. माता सविन्दर हरदेवजी यांनी सद्गुरु रुपात मिशनची धुरा 2016 मध्ये आपल्या खांद्यावर घेतली. त्या अगोदर सतत 36 वर्षे त्यांनी बाबा हरदेवसिंहजी यांच्या समवेत प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले पूर्ण योगदान दिले आणि निरंकारी जगतातील प्रत्येक भक्ताला आपल्या वात्सल्याने भारून टाकले. प्रेम, करूणा आणि दैवी शक्तिचा अनुपम मिलाफ त्यांच्यामध्ये एकवटला होता. 
शेवटी सद्गुरु माताजींनी सकळजनांसाठी मंगल कामना करताना म्हटले, की जेव्हा आपण निराकार प्रभूला जीवनाचा आधार करतो तेव्हा सेवा, स्मरण आणि सत्संगाला प्राथमिकता देऊन आपण या निराकार प्रभूच्या रंगात रंगून जातो आणि अहंभावापासून आपली सुटका होते. 
या संत समागमामध्ये सद्गुरु माता सविंदर हरदेवजी यांच्या विचारांचा संग्रह ‘‘युग निर्माता‘‘ या पुस्तकाचे विमोचन निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले.जत शाखेच्या वतीने ही प पु सागरजी इंगवले प्रचारक मुंबई यांचे प्रमुख उपस्थितीत १५ आंँगस्ट मुक्ती पर्व दिवस कार्यक्रम बचत भवन जत येथे आयोजित करण्यात आला त्यावेळी तालुक्यातुन मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments