विठोबा पाटील यांचे निधन



जत/प्रतिनिधी:- अचकनहळळी ता.जत येथील माजी पोलीस पाटील विठोबा आप्पासाहेब पाटील (वय९२) यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले व पाच मुली, पत्नी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
       अचकनहळळी गावात त्यांनी ३५ ते ४० वर्ष पोलीस पाटील म्हणून काम केले आहे. गावातील अनेकांचा प्रपंच उभारण्यात त्यांचा सर्वात मोठा वाटा आहे. गोरगरिबांचे कैवारी म्हणून त्यांना ओळखले जात, कोणत्याही कारणास व अडचणीच्या वेळेस ते मदतीस धावून येत होते. तसेच त्यांनी गावातील अनेक घटकांना मदतीचा हात देण्यात कधीही कसर केली नाही. सर्वसामान्यांना न्याय देणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती होत. त्यांच्या या निधनाने सामाजिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments