जत तालुक्यात सव्वा १३ लाखांचा ओला गांज्या जप्त

तालुक्यातील माणिकनाळ येथे उमदी पोलीसांची कारवाई; डांळिब बागेत गांजाची लागवडजत(जॉकेश आदाटे):- जत तालुक्यातील माणिकनाळ येथे डांळिब बागेत बेकायदेशीर लावलेल्या गांज्या शेतीवर उमदी पोलीसांनी छापा टाकत तब्बल १३ लाख ३९ हजाराचा ओला गांज्या जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी महासिध्द लक्ष्मण बगली रा.माणिकनाळ ता.जत याला ताब्यात घेतले आहे. बुधवारी दुपारी दोन वाजता ही कारवाई करण्यात आली.
        पोलीस अधिक्षक दिक्षित गेडाम, अपर पोलीस अधिक्षक मनीषा दुबुले, डीवायएसपी रत्नाकर नवले यांच्या आदेशानुसार सा.पो.नि.पंकज पवार, पो.उप-निरिक्षक लक्ष्मण खरात, पो.हे.कॉ. नितीन पलुसकर, नामदेव काळेल, पो.ना. श्रीशैल वळसंग, पुजा घार्गे, पो.शि. शिवाजी हाके, सिध्देश्वर मोरे, महेश स्वामी, सोमनाथ पोटभरे, आप्पा घोडके, आप्पा कुंभारे यांच्या पथकांने हि कारवाई केली आहे.
        याबाबत अधिक माहिती अशी, माणिकनाळ येथील महासिध्द बगली यांनी डांळिबाच्या बागेत गांज्याची झाडे लावल्याची माहिती खबऱ्याकडून सा.पो.नि.पंकज पवार यांना मिळाली होती, त्या आधारे छापा टाकला असता डाळिंब बागेमध्ये हिरव्या रंगाची ओलसर पानाची व उग्र वासाचे ५ ते ६ फुट उंचीचे ७८ झाडे बेकायदा लावल्याची आढळून आली. त्याचे वजन १३३ किलो ९१ ग्रॅम भरले आहे. बाजारभावा प्रमाणे प्रति किलो १० हजार दराने तब्बल १३ लाख ३९ हजार १०० रूपये होतात. सर्व रोपे वजन करून पंचासमक्ष पोलीसांनी ताब्यात घेतली आहेत.

Post a Comment

0 Comments