जिल्हा बँकेच्या विभागीय अधिकारी पदी राजेंद्र नाटेकर यांची नियुक्ती; सर्व कर्मचाऱ्यांच्या हस्ते स्वागत
जत/प्रतिनिधी:- जत येथील जिल्हा बँकेच्या तालुका विभागीय अधिकारी पदी राजेंद्र नाटेकर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांचा हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. ही नियुक्ती वसुली विभागाकडून करण्यात आली आहे. तसेच वसुली अधिकारी पदी भानुदास दुधाळ यांची नियुक्ती करण्यात आली.
        यावेळी जत मार्केटयार्ड शाखाधिकारी तानाजी काशीद, फिल्ड ऑफिसर बसवराज चव्हाण, इंद्रजीत वाघमारे, संदीप सोलनकर, संजू कांबळे, नामदेव कांबळे, प्रशांत हिरेमठ, रमेश कोळी व माजी तालुका विभागीय अधिकारी आर टी कोळी आदीजन उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments