जतमध्ये काँग्रेसची आझादी गौरव पदयात्राजॉकेश आदाटे/जत:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेसच्यावतीने जत शहरातून आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेमध्ये पदाधिकाऱ्यांसह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.
       यावेळी माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार विक्रमसिंह सावंत, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश वक्ता सेल अध्यश जबगी, तसेच तालुका अध्यक्ष अप्पाराया  बिराजदार उपस्थित होते. पदयात्रा जत मार्केट कमिटी, बसवेश्वर चौक, बनाळी चौक, लोखंडी पूल, किस्मत चौक, छ. संभाजी चौक, छ. शिवाजी चौक, वाचनालय चौक, दगडी पूल येथून गांधी चौक येथे आली. याठिकाणी सभा झाली. यावेळी डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, केंद्र शासनाकडून जुलमी अन्याय सुरू आहे. सध्या जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केलं जात आहे. याविरोधात कॉंग्रेस ताकतीने लढेल.
        यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अप्पाराया  बिराजदार, कार्यअध्यश सुजय उर्फ नाना शिंदे, जि.प. सदस्य महादेव पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील, पं.स. माजी सभापती बाबासाहेब कोडग, बसवराज बिराजदार, मल्लेश अण्णा कत्ती, रवींद्र सावंत, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष तुकाराम माळी सर, विक्रम फाऊंडेशन अध्यक्ष युवराज निकम, माजी नगरसेवक निलेश बामणे, माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे, महादेव कोळी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments