आवंढी गावात फडकला सांगली जिल्ह्यातील सर्वात उंच तिरंगा



जॉकेश आदाटे/जत:- तालुक्यातील आवंढी येथे स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त श्री दत्त कला क्रीडा व्यायाम मंडळाच्या वतीने आवंढी (मानिकनगर) येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सांगली जिल्ह्यातील सर्वात उंच ७५ फूट उंचीवर तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण जत तालुक्याचे तहसिलदार जीवन बनसोडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
       यावेळी सरपंच आण्णासाहेब कोडग यांनी सांगितले गावातील ६७० कुटुंबाच्या घरावरती लोकांनी स्वयंप्रेरणेने तिरंगा ध्वज फडकवला आहे.
       तहसिलदार बनसोडे यांनी आवंढी गावातील गावकऱ्यांचे व ग्रामपंचायतीचे कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, पोस्टमन यांनी या कार्यात सहकार्य केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
       याप्रसंगी आवंढी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोडग, सोसायटी चेअरमन लक्ष्मण कोडग, सर्कल संदीप मोरे साहेब, सुलेमान जेलर, माजी उपसरपंच आण्णासाहेब बाबर, दगडु कोडग, सुभाष कोडग, विनोद कोडग व माणिकनगर मधील सर्व शाळेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महीला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments