जत येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन |15 ऑगस्ट स्वातंत्रदिनी जत हायस्कूल उच्च माध्यमिक कला शाखेचा अभिनव उपक्रमजत/प्रतिनिधी:- येथील दि फ्रेंड्स असोसिएशन जत संचलित, जत हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, जत येथे 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमिताने उच्च माध्यमिक कला शाखेच्या वतीने राबवण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन, दि फ्रेड्स असोसिएशन जल या संस्थेचे सचिव मा. डॉ. एस. व्ही. तंगडी यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा लाभ जत तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन, संस्थेचे सचिव डॉ. एस. व्ही. तंगडी यांनी केले. 
         याप्रसंगी संस्थेचे चेअरमन, श्री. जी. बी. ऐनापुरे, संस्थेचे संचालक, मा. श्री. देवेंद्र पोतदार, संस्थेच्या सदस्या, मा. डॉ. सौ. एस. व्ही. तंगडी विद्यालयाचे मुख्याध्यापक, श्री. ए. बी. होवाळ, पर्यवेक्षक, श्री. एम. एस. माळी, ग्रंथपाल श्री. राजेंद्र दुगाणे सर्व अध्यापक-अध्यापिका, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments