स्वखर्चातून बसवले 'एलईडी लाईट्स'; युवा नेते श्रीकांत सोनवणेजत/प्रतिनिधी:-  शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या प्रभाग क्र. ८ मधील दानेश्वरी कॉलनी व  रामराव नगर परिसरातील नगरपरिषदेच्या विद्युत खांबावरील अनेक एलईडी लाईट काही दिवसापासून बंद अवस्थेत होते. ही बाब प्रभागातील युवा नेते श्रीकांत सोनवणे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ स्वखर्चाने 'एलईडी' लाईट्स बसवून एक सामाजिक बांधिलकी जपली आहे.
       शहरातील अनेक प्रभागात विद्युत खांबावरील एलईडी लाइट्स गेले तीन ते चार महिन्यापासून बंद अवस्थेत आहेत. याकडे नगरपरिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. ही बाब श्रीकांत सोनवणे यांच्या लक्षात येताच प्रभाग क्रमांक आठ मधील रामराव नगर, साळे वस्ती व दानेश्वरी कॉलनी येथे बंद पडलेल्या एलईडी यांनी स्वखर्चाने बसवून एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे या प्रभागातील नागरिकांमधून केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

अनेक प्रभागातील एलईडी लाईट बंद असल्याने अंधाराचा गैरफायदा घेऊन चोरीचे प्रमाण देखील वाढले आहे. युवा नेते श्रीकांत सोनवणे यांचा आदर्श घेऊन जत नगरपरिषदेतील विद्यमान गरसेवकांनी आपल्या प्रभागातील बंद पडलेल्या एलईडी लाइट्स स्वखर्चाने बसवाव्यात. जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही.

Post a Comment

0 Comments