अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी विशाल कांबळे

उपाध्यक्षपदी अजित वाघमारे, सचिवपदी मच्छिंद्र कांबळेजत/प्रतिनिधी:- येथील अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी विशाल कांबळे यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी अजित वाघरे, सचिवपदी मच्छिंद्र कांबळे, खजिनदार पदी आशुतोष ऐवाळे, तर सदस्यपदी दऱ्याप्पा जतकर, जकप्पा केंगार, अजित मेहत्रे, राजु कांबळे, दीपक कांबळे, दत्ता हेगडे, लक्ष्मण वाघमारे, चंद्रकांत धोडमणी, आदी जणांच्या निवडी करण्यात आल्या. सर्व समाज बांधवांच्या वतीने या निवडी करण्यात आल्या.
        यावेळी बोलताना अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष विशाल कांबळे म्हणाले. की मोठ्या प्रमाणात शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येणार असून त्यांचे विचार आजही तरुणांना प्रेरणादायी असल्याचे विशाल कांबळे म्हणाले.

Post a Comment

0 Comments