अपघातात तरुण ठार | खोजानवाडीतल घटना | मृत लोहगावचाजत/प्रतिनिधी:  जत तालुक्यातील खोजानवाडी येथे खत उतरविण्यासाठी टेम्पो मागे घेत असताना टेम्पोच्या मागील चाकाखाली सापडून लोहगाव (ता. जत) येथील अजय बाबासाहेब सुर्वे (वय २५) हा तरुण ठार झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली.
           मृत अजय सुर्वे हा आवंढी (ता.जत) येथील सुरेश विश्वंभर कोडग यांच्याकडे टेम्पो चालक म्हणून काम करीत होता. शुक्रवारी सकाळी खोजानवाडी येथील एका शेतकऱ्याच्या मळ्यामध्ये तो खत उतरविण्यासाठी गेला होता. टेम्पोतील खत उतरविण्यासाठी तो गाडीच्या मागे उभा राहून फाळका काढत होता, तर त्याचा सहकारी टेम्पो मागे घेत होता. टेम्पोबरोबर सुर्वे हाही मागे येत होता. अचानक शेतातील ढेकळांमध्ये पाय अडकून तो खाली पडला. हे चालकाच्या लक्षात आले नाही. टेम्पो डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती जत पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठविला. अजयचा मृत्यू संशयास्पद असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments