वीटभट्य्याचे यांत्रिकीकरण करून गाढवाचे शोषण कमी करण्याचा ॲनिमल राहतचा प्रयत्न यशस्वी

गाढवांन ऐवजी ट्रॅक्टर वापरून सामाजिक आर्थिक प्रगती

पश्चिम महाराष्ट्रात कृष्णा व तिच्या उपनद्यांच्या तीरावरती मोठ्या संख्येने वीटभट्य्या आहेत पूर्वी पासून वीटभट्य्या मध्ये माती वीट वाहून नेण्यासाठी बेलदार,वडार,कैकाडी समाजाकडून गाढवांचा वापर केला जातो, पोटासाठी वीटभटीवर पाच सहा महिने दिवसरात्र काम करणे हाच एक उत्पनाचा स्रोत आणि त्यासाठी गाढव हेचं त्याचे यंत्र,स्वतःला राहण्यासाठी जागा नाही गाढवणासाठी कुटून आणणार म्हणून त्यांना चरण्यासाठी नजीकच्या शहरात सोडणे हाच एक उपाय! 

           गाढवांकडून ४५ अंश तापमानात देखील प्रमाणापेक्षा जास्त ओझे वाहून घेण्यात येते त्यामुळे गाढवाना असह्य अश्या वेदना सहन कराव्या लागतात काम झाल्या नंतर त्यांना त्यांच्या मालकाकडून परिस्तिथी नसल्या मुळे चरण्यासाठी शहरात मोकळे सोडतात, याचा त्रास शहरातील वाहतुकीस तसेच सोडलेली गाढवे शेतात जाऊन पिकांचे नुकसान करत असतात बऱ्याचद्या गाढवाचे अपघात होतात त्याचा नागरिकांना ही त्रास सहन करावा लागतो एकंदरीत गाढवाचे संपूर्ण आयुष्य हे उपेक्षितचं...
             ॲनिमल राहत ही सेवा भावी संस्था कष्टकरी जनावरांसाठी (बैल घोडा गाढव) मोफत औषधोपचार तसेच प्रबोधनाचे कार्य करते २०१५ पासून ॲनिमल राहतने गाढवाना त्रास मुक्त तसेच गाढवांचा होणारा पारंपरिक वापर कमी करण्यासाठी वीटभट्य्याचे यांत्रिकीकरण करण्याचे काम हाती घेतले त्याच बरोबर शेकडो गाढवाचां मोफत औषधोउपचार करून असह्य वेदना कमी करण्याचे अखंड कार्य चालू आहे,सुरुवातिच्या काळात गाढव आणि विठभट्टीचे मालक यांत्रिकीकरण करण्यासाठी इच्छुक न्हवते पण ॲनिमल राहतच्या सदस्यांनी वीठभट्टीवरती गाढव वापरून होणारे आर्थिक-वेळेचे नुकसान त्यांना सांभाळण्यासाठी लागणार खर्च त्यापेक्षा ट्रॅक्टर वापरून वाचणारा वेळ त्याच वेळेत ट्रॅक्टर इतर कामासाठी वापरून मिळणारा आर्थिक नफा तसेच बिगरहंगामात सुद्धा ट्रॅक्टर वापरुन होणारा आर्थिक लाभ लक्षात आणून दिला,याचा परिणाम म्हणून २०१५ पासून ॲनिमल राहतच्या पुढाकाराने आणि आर्थिक सहाय्याने आत्ता पर्यंत १३ वीटभट्य्याचे यांत्रिकीकरण करून १७३ गाढवांना शोषण मुक्त केले शोषण मुक्त झालेली सर्व गाढवं ॲनिमल राहतच्या प्राण्यांच्या आश्रमात आनंदी जीवन जगत आहेत २०२१-२२ या आर्थिक वर्ष्यात ३ वीटभट्य्याचे यांत्रिकीकरण करून जयसिंपूर येथील सखुबाई जाधव,हरिबा मोहिते,बाबू मोहिते यांच्या १५ गाढवांना ॲनिमल राहतने कायमस्वरूपी सांभाळण्यासाठी घेऊन त्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी आर्थिक मदत केली आहे.

शिक्षण आणि सामाजिक विज्ञान संशोधन या आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये यांत्रिकीकरणाचा वीटभट्य्या वर पडणारा प्रभाव व तेथील गाढवांचे पालकत्व यावर लेख छापून संस्थेच्या कामाची दखल देश विदेशात पोहचवली आहे.

ॲनिमल राहतचे सीईओ डॉ. नरेश उप्रेती म्हणतात की "गाढवांच्या जागी इको-ट्रॅक्टर्स घेतल्याने गाढवांपासून ते त्यांच्या पूर्वीच्या भट्टी मालकापर्यंत सर्वांनाच फायदा होतो."ॲनिमल राहत अधिक कुटूंबाना त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत करण्यास आणि गाढवांना वीठभट्टीतील आधीच्या कामातून मुक्त करण्यास तयार आहे".
            यांत्रिकीकरण कार्यक्रम राबवण्याव्यतिरिक्त, ॲनिमल राहतचे पशुवैद्यकीय कर्मचारी, पशुवैद्यकीय सहाय्यक, प्राण्याचे देखभालकर्ते, आणि सामूहिक प्रशिक्षक गरजू प्राण्यांना पशुवैद्यकीय सेवा पुरवतात,प्राण्यांचा धोक्यापासून बचाव करतात,प्राण्यांवरील क्रूरता रोखण्यासाठी सामाजिक जनजागृती करतात आणि त्यांच्या आश्रयस्थानातील निवृत्त प्राण्यांची आजीवन काळजी घेतात.
          अ‍ॅनिमल राहतच्या आवाहनास प्रतिसाद देऊन,वीटभट्टीवर गाढवांनऐवजी ट्रॅक्टरचा वापर करून गाढव मालकांनी स्वतःची प्रगती करून,गाढवांना वेदनादायक कामातून त्यांची मुक्तता केली. त्यांचा हा सकारात्मक प्रतिसाद इतरांना दिशा दाखवेल.
 - शशिकर भारद्वाज
        कम्युनिटी डेव्हलपमेंट मॅनेजर 

Post a Comment

0 Comments