जिल्हा पुरस्कार प्राप्त मच्छिंद्र ऐनापुरे यांचा मागासवर्गीय संघटनेमार्फत सत्कारजत/प्रतिनिधी:- सांगली जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षक बाल साहित्यिक व स्तंभलेखक, उत्कृष्ट पत्रकार मच्छिंद्र ऐनापुरे यांना सन-2021-22 पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आले.
          यावेळी मच्छिंद्र ऐनापुरे यांचा शाल, पुष्पहार गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी राज्य उपाध्यक्ष- संतोष काटे, पुणे विभागीय सचिव-प्रल्हाद हुवाळे, तालुकाध्यक्ष-सुनील सुर्यवंशी, तालुका कोषाध्यक्ष-शांतीलाल साळुंखे, शिक्षक नेते-पिरापा ऐवळे, त्याचबरोबर शिक्षक संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख-सिकंदर शेख,मल्लिकार्जुन माळी, प्रकाश माळी(गुरुजी), शिवाजी करवर आदींनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
          यावेळी सत्कारमूर्ती ऐनापुरे म्हणाले की, आपण सर्वांच्या प्रेमामुळे मला आज जिल्हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून सेवा करीत असताना साहित्यिक म्हणून मी 6 ते 7 पुस्तके प्रकाशित केले. तसेच अजून 3 पुस्तके येत्या काही दिवसात प्रकाशित होणार आहेत. हे पुस्तके नक्कीच विध्यार्थ्यांना व शिक्षकांना मनोरंजन करतील अशी आशा व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संतोष काटे यांनी केले. आभार सुनील सुर्यवंशी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments