जीपची दुचाकीस धडक; पती-पत्नी सह बालक गंभीर जखमी


जत/प्रतिनिधी:- जत सांगली रस्त्यावर जत पासून चार किलोमीटर अंतरावर रामपूर फाट्यानजीक जिप व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार पती-पत्नीचा व बालक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली.
        तारासिंग गोविंद जाधव (वय ३२) व त्यांची पत्नी कमल तारासिंग जाधव (वय ३०) व मुलगा श्रीकांत तारासिंग जाधव (वय ६ वर्ष मुळगाव मदभावी जि. विजापूर, कर्नाटक सध्या रा. तासगाव) अशी जखमींची नावे आहेत. मूळचे मदभावी (जि. विजापूर) येथील तारासिंग जाधव गेल्या काही वर्षापासून मजुरीसाठी तासगाव येथे राहत आहेत. काही कामानिमित्त ते पत्नी व मुलास घेऊन दुचाकीवरून मदभावीस निघाले होते. अपघातग्रस्त मोटारीतून येळावी (ता. तासगाव) येथील नंदकुमार विलास डोंगरे हे नातेवाइकांसह बिरोबा देवस्थान येथे दर्शन घेऊन गावी परतत होते. रामपुर फाट्याजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. अपघातात दुचाकीस्वार ताराचंद यांच्यासह पत्नी कमल व मुलगा श्रीकांत हे तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ जत ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तातडीने सांगलीला हलविण्यात आले. अपघाताची नोंद जत पोलीस ठाण्यात झाली असून, अधिक तपास जत पोलीस करत आहे.

Post a Comment

0 Comments