अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज: विनायक माळी

बनाळीत प्रात्यक्षिकासह प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन


जत/ प्रतिनिधी: अंधश्रद्धा निर्मूलन ही काळाची गरज बनली असून आधुनिक युगामध्येसुद्धा कायदे असूनही भारतातील खूप लोक याचे बळी पडत आहेत, असे मत सोलापूर जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष विनायक माळी यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मौजे बनाळी ता. जत येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी डॉ. विद्याधर किट्टद अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
         आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. विद्याधर किट्टद म्हणाले, समाजामध्ये खूप भोंदू बाबा गरीब व अशिक्षित लोकांना अंधश्रद्धेच्या नावाने पिळवणूक करीत आहेत. एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून आपण अशा गरीब व अशिक्षित व्यक्तींना यातून बाहेर पडण्यासाठी न्याय मिळवून दिला पाहिजे. 
         या कार्यक्रमाला प्रा. चंद्रसेन मानेपाटील, इब्राहिम नदाफ, रवि सांगोलकर, कार्यक्रम अधिकारी डॉ. विजय जाधव, प्रा. पुंडलिक चौधरी, प्रा. तुकाराम सन्नके, राष्ट्रीय सेवा योजना समितीतील सर्व सदस्य, शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक, स्वयंसेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments