टेम्पोच्या धडकेत १२ वर्षीय विद्यार्थी ठार



जत/प्रतिनिधी:- अचकनहळ्ळी ते वायफळ या रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत एका शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. राहुल भाऊसाहेब शिंदे (वय. १२ रा.अचकनहळ्ळी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बेजबाबदारपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी चालक तानाजी धोंडीराम कोडग रा. आवंढी ता.जत यांच्यावर जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
           याबाबत अधिक माहिती अशी की, जत अचकनहळ्ळी-वायफळ या रस्त्यावर शिंदे यांचे घर आहे. दुपारी राहुल शिंदे हा आपले मित्र अथर्व सोलंनकर यांच्यासोबत सायकलवरून रस्त्यावरून जात होता. दरम्यान समोरून तानाजी कोडग यांचा टेम्पो भरधाव वेगाने येत होता. यावेळी राहुलच्या सायकलीला टेम्पोने जोरदार धडक दिली. यात राहुल जागीच ठार झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा अधिक तपास पीएसआय लवटे करत आहे.

Post a Comment

0 Comments