आपल्याला सुख आणी परमानंदाची प्राप्ती करूण घ्यायची असेल तर श्री. स्वामी समर्थ महाराजांची भक्ती केली पाहीजे; ह.भ.प.रविंद्र महाराज


जत/प्रतिनिधी:- आपल्याला सुख आणी परमानंदाची प्राप्ती करूण घ्यायची असेल तर श्री. स्वामी समर्थ महाराजांची भक्ती केली पाहीजे. असे प्रतिपादन ह.भ.प.श्री. रविंद्र महाराज पिंपळगावकर यानी केले आहे. ते येथिल श्री. स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रष्ट जत यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री. स्वामी समर्थ  महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त आयोजीत करण्यात आलेल्या एकदिवसीय किर्तन महोत्सव कार्यक्रमात प्रबोधन करित होते. 
        जत येथिल श्री. स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रष्ट जत यांच्यावतीने वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. श्री. स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रष्ट जत चे अध्यक्ष श्री. बापूसाहेब पवार, उपाध्यक्ष श्री. अशोक तेली, सचिव श्रीकृष्ण पाटील, दिपक पाटणकर, शहाजीबापू भोसले, सदाशिव (दादा) जाधव आदी ट्रष्टचे पदाधिकारी यामध्ये हिरिरीने सहभाग घेऊन हे सर्व कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडतात. 
         श्री. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त पहाटे श्री. स्वामी समर्थ महाराजांची अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या  किर्तन महोत्सव कार्यक्रमात प्रबोधन करताना ह.भ.प.श्री. रविंद्र महाराज पिपळगावकर म्हणाले की, प्रत्येकाने परमेश्वराची भक्ती केली पाहीजे, परमेश्वर आपणाला जसी आपली भक्ती त्याप्रमाणे आपल्याला त्याचे फळ देत असतो. माणूस शेवटच्या क्षणी आपल्याबरोबर जाताना धन,संपत्ती, जमिन, काहीही न नेता सर्व काही पाठीमागे ठेवून जातो. तो आपल्या बरोबर फक्त आयुष्यात  जे सत्कर्म केले आहे तेच बरोबर घेऊन जातो. त्यामुळे प्रत्येकाने आपणाला मिळालेल्या संपत्तीतून थोडेतरी दान केले पाहीजे. 
          जो माणूस जसे कर्म करित जातो परमेश्वर परमात्मा त्याप्रमाणे  त्याच्या पदरात फळ टाकतो. चांगले कर्म करणा-यास चांगले फळ मिळते तर वाईट कर्म करणा-याला वाईट फळ मिळते. परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाने श्री. क्षेत्र गाणगापुर व अक्कलकोट या ठिकाणी गेले पाहीजे असे ही रविंद्र महाराज पिपळगावकर म्हणाले. 
         प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची व परमेश्वराची  सेवा केली तर त्याला जिवनात सुख, शांती व समाधान मिळून आत्मानंदाची व परमानंदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे प्रत्येकाने श्री.स्वामी समर्थ महाराजांची भक्ती व सेवा करावी असेही ह.भ.प.श्री. रविंद्र महाराज पिपळगावकर म्हणाले. 
         यावेळी मराठा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित जत चे चेअरमन श्री. गणेश सावंत, नगरसेवक श्री. स्वप्निल शिंदे, . अंबिका नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. शहाजीबापू भोसले, श्री. रामराव विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर काॅलेजचे माजी प्राचार्य श्री. वसंतराव बोराडे, शिवसेना नेते श्री. दिनकर पतंगे,  महादेव पवार, सागर व्हसमाळे, अतुल मोरे, वसंत उगळे, गोटू जाधव, शंकर वाघमोडे, सुहास व्हसमाळे, सौ.शालन पवार, दिनराज वाघमारे,बापू पोरे,पिंटू मोरे,सागर व्हसमाळे, नारायण पवार, आदी मान्यवर उपस्थित होते. 
श्री. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त दुपारी श्री. स्वामी समर्थ महाराज चरणी फुले वाहण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्वांना ट्रष्टचे वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Post a Comment

0 Comments