अंकलगी येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यूजत/प्रतिनिधी : अंकलगी ता.जत येथील वीज वितरण कंपनीच्या तारेला स्पर्श झाल्याने शॉक लागून तरूणाचा मृत्यू झाला. पैगंबर मिरासाहेब मुल्ला (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे.
          घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अंकलगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेत कंपाऊंडला लागून सौचालये बांधन्यात आले आहेत व त्यावर ५०० लिटरची पाण्याची टाकी आहे. त्यावर अवघ्या अडीच ते तीन फूटावरुन मुख्य विधुत वाहिनीची तार गेली आहे. पाण्याची टाकी ओव्हरफ्लो होऊन पाण्याची पाईप निघाली होते. पाण्याची नासाडी होते, म्हणून पैगंबर मुल्ला शौचालयाच्या टाकीवर चढून पाईप बसवण्यासाठी चढले होते. पाईप बसवून उठले असता अवघ्या अडीच ते तीन फूटावर असलेल्या मेन लाईनची तार डोक्याला स्पर्श झाली व ते खाली दगडावर पडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ते लहान असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन एक-दोन वर्षाची लहान मुले आहेत. घरच्य कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments