सहकारी संस्थांनी समाजसेवेचे व्रत हाती घ्या- तुकाराम महाराज

रांजणी येथील सैनिक रांजणी सोसायटीच्या वतीने तुकाराम महाराज यांचा सत्कार         निस्वार्थ सेवाभाव मनी असला की जगणे सोपे होते. एकमेकांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. पश्चिम महाराष्ट्र हे सहकार क्षेत्र म्हणून ओळखले जाते. तेव्हा सहकारी संस्थांनी समाजसेवेचे व्रत हाती घेत गोरगरिबांना सहकार्य करावे असे आवाहन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केले.
         कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी येथील सैनिक रांजणी क्रिडेट को. ऑफ. सोसायटीच्या वतीने कोरोना, अतिवृष्टी, दुष्काळ काळात तुकाराम बाबा महाराज यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जि. प.  सदस्य माणिकराव भोसले, सोसायटीचे चेअरमन आण्णासाहेब भोसले, दिपकराव  बाबर,  शंकर भोसले, व्हा. चेअरमन आकाराम मोटे, संचालक जीवनराव भोसले, यशवंत पवार, विश्वास पाटील, रावसो भोसले, विठ्ठल बंडगर, सिद्राम सरगर, मायावती जमदाडे, संगीता पवार, हरी भोसले,  अनिल भोसले, ग्रामपंचायत सदस्य संतोष पवार, मुख्याध्यपक अशोकराव भोसले, राष्ट्रवादीचे युवा नेते संजय भोसले, यशवंतराव पवार, सोपान भोसले,  किरण भोसले, शशिकांत पवार, लिपिक दिलीप शिंदे, अजित भोसले आदी उपस्थित होते. 
          सोसायटीचे चेअरमन आण्णासाहेब भोसले यांनी तुकाराम बाबा महाराज यांनी केलेल्या समाजकार्याचे कौतुक केले. राष्ट्रीय संत गाडगेबाबा, श्री संत बागडेबाबा यांच्या समाजसेवेच्या विचारांचा वारसा तुकाराम बाबा यांनी जपला असल्याचे सांगितले. सत्काराला उत्तर देताना तुकाराम बाबा महाराज म्हणाले की, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून गोरगरिबांना सहकार्य केले जाते. या अभिनव उपक्रमाला सर्वांनी सहकार्य करावे.  जत तालुक्यातील संख येथील बाबा आश्रमात वैराग्यसंपन्न बागडेबाबा यांचे माझ्या स्वप्नातील मंदिर उभारले आहे. येत्या २१ मे ला त्याचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे तेव्हा त्या सोहळ्यास सर्वांनी यावे असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांनी केले.

Post a Comment

0 Comments