जत येथे प्रदीर्घ कालावधीनंतर सुपरस्टार सर्कसची हजेरी; नागरिकांनी लाभ घ्यावा; प्रकाश मानेजत/प्रतिनिधी:- जत येथे प्रदीर्घ कालावधीनंतर सुपरस्टार सर्कसची हजेरी. संपूर्ण भारतात एक मात्र महाराष्ट्रीयन सुपरस्टार सर्कस नावलौकिक मिळवलेले. तसेच सुप्रसिद्ध अश्या सर्कसीला जत येथे रविवार पासून सुरुवात झाली असून याचा लाभ नागरीकानी घ्यावा असे आवाहन सुपरस्टार सर्कसचे प्रोप्रा. प्रकाश माने यांनी केले आहे.
           यावेळी बोलताना प्रकाश माने म्हणाले की, गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या महामारीमुळे सर्कसला वाईट दिवस आले होते. पण कोरोनाची लाट संपल्यानंतर पुन्हा एकदा सर्कस सुरुवात केली असून, या सरकसीत एकूण ९० कर्मचारी असून दिवसातून दोन वेळा सर्कसचा खेळ चालणार आहे. लहान मुलांसाठी अडीच फुटी जोकर तसेच हवाई जोडी असे निरनिराळे खेळ दाखवण्यात येत असून, तीस वर्षानंतर पुन्हा एकदा सुपरस्टार सर्कस जत येथे आले आहे. स्थळ विजापूर रोड डॉ माळी पार्क येथे असून नागरिकांनी, जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन सुपरस्टार सर्कसचे प्रोप्रा प्रकाश माने यांनी केले आहे. दररोज दोन खेळ दुपारी १ वाजता व रात्री व ८ वाजता शनिवारी व रविवारी तीन खेळ असून दुपारी १ वाजता सायंकाळी ५ वाजता व रात्री ८ वाजता केले जाणार असून याचा लाभ घ्यावा असे माने म्हणाले.

Post a Comment

0 Comments