जत येथे रविवारी एकदिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन


जत/प्रतिनिधी:- श्री. स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रष्ट जत यांच्यावतीने रविवार दि. ३ एप्रिल रोजी श्री. स्वामी समर्थ महाराज प्रकटदिनाच्या निमित्ताने एक दिवशिय किर्तन महोत्सवाचे आयोजन.झी टि.व्ही. फेम  किर्तनकार प्रती इंदूरीकर  ह.भ.प.श्री. रविंद्र महाराज (पिंपळगावकर) व श्री. सागर महाराज  बोराटे यांची होणार किर्तने. 
           जत येथिल आर.आर.काॅलेज च्या पाठीमागील बाजूस छत्रपती शिवाजी महाराज नगर या ठिकाणी श्री. स्वामी समर्थ मंदिरात वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दर पोर्णिमेदिवशी येथे श्री. स्वामी समर्थ महाराजांची अभिषेक पूजा, भजन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असून श्री. स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रष्ट जत ने महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार यांना झी टी.व्ही. च्या माध्यमातून गजर किर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना संधी उपलब्ध करून दिली आहे. श्री. स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रष्ट जत ने कोविड कालावधीत कोविड रूग्णांच्या नातेवाईकांना महिनाभर अन्नदान केले आहे. 
           रविवार दि.३ एप्रिल २०२२ रोजी श्री. स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रष्ट जत यांच्यावतीने श्री. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून रविवारी पहाटे श्री. स्वामी समर्थ महाराजांची अभिषेक पूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी नऊ वाजता विरशैव भजनी मंडळ रामपूर ता.जत.यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे   त्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार ज्यांना प्रती इंदोरीकर म्हणतात ते ह.भ.प.श्री. रविंद्र महाराज (पिंपळगावकर),संगमनेर  यांच्या किर्तनाचा कार्यकम होणार आहे. दुपारी बारा वाजता श्री. स्वामी समर्थ महाराजचरणी  पुष्पवहाणेचा कार्यक्रम  करण्यात येणार असून दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. 
          रविवारी सायंकाळी ठिक पाच वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार झी.टि.व्ही. फेम ह.भ.प.श्री. सागर महाराज बोराटे नातेपुते जि.सोलापूर यांच्या किर्तनाचा कार्यकम होणार आहे. या वेळी श्री. स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रष्ट जत चे आधारस्तंभ श्री. नारायण(भाऊ) पांडुरंग पवार यांच्या पंच्याहत्तरी (अमृत महोत्सव) निमित्त त्यांच्या  वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
          श्री. स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सर्व कार्यक्रमास सर्व श्री. स्वामी समर्थ भक्तानी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रष्ट जत अध्यक्ष बापूसाहेब पवार यांनी केले आहे. 
          श्री. स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रष्ट जत चे अध्यक्ष बापूसाहेब पवार, उपाध्यक्ष अशोक तेली, सचिव श्रीकृष्ण पाटील, दिपक पाटणकर, शहाजीबापू भोसले, सदाशिव (दादा) जाधव व सर्व श्री. स्वामी समर्थ महाराज भक्त हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत.

Post a Comment

0 Comments