राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण सोहळ्यास हजारोच्या संख्येने उपस्थित रहा; प्रकाश व्हनमाने


जत/प्रतिनिधी:- सांगली येथे दि. २ एप्रिल रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे लोक अर्पण सोहळ्यास लाखोचे संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे जाहीर आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्या, जत या पतसंस्थेचा चेअरमन प्रकाश व्हनमाने यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. यावेळी योगेश दादा व्हनमाने व नदीम पखाली उपस्थित होते.
            प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे की,  सांगली-मिरज रोड विजयनगर येथे दि. २ एप्रिल रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे लोक अर्पण सोहळा संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमाकरिता महाराष्ट्राचे जेष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक मा. खासदार शरदचंद्रजी पवार हे उपस्थित राहून त्यांचे हस्ते सदर स्मारकाचे लोक अर्पण सोहळा संपन्न होणार आहे. व तसेच सांगली येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे भव्य स्मारक व्हावे अशी सांगली जिल्ह्यातील तमाम सर्व धनगर समाज बांधवाची मागणी होती. व यांचा विचार करून सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर प्रा. नितीन सायगावे व महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक विष्णु माने व त्यांच्या सहकार्याने सदर स्मारक होणेचा पाठपुरावा करून व प्रयत्नांची पराकाष्टा करून अतिशय जिद्दीने स्मारक उभा करणेचे महान कार्य केले असून त्याबद्दल त्यांना तमाम सर्व धनगर समाजाचे वतीने धन्यवाद व त्याच बरोबर या कामासाठी अनेक पक्षाच्या नेते मंडळींनी या स्मारकासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलेत त्याचे शतशः आभार. तसेच या स्मारकाला आर्थिक निधी मिळवून देण्यासाठी व स्मारकाचे काम पूर्ण करणेसाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयंतरावजी पाटील यांनाही मोलाची कामगिरी केली असलेने सर्व तमाम धनगर बांधवाचे वतीने त्यांचे शतशः आभार.

Post a Comment

0 Comments