जत येथील सुप्रसिद्ध पीएसबी ज्वेलर्सतर्फे उद्या 'लकी ड्रॉ' सोडत

तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजनजत/प्रतिनिधी:- जतमधील प्रकाश शिवप्पा बंडगर यांच्या पीएसबी ज्वेलर्सच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त दिवाळी धमाका ऑफरची सोडत दि. ३० एप्रिल रोजी शिवानुभव मंडप जत येथे होणार आहे. सकाळी १० वाजता कार्यक्रमास सुरुवात होणार आहे.
          यानिमित्त आरोग्य तपासणी व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पीएसबी ज्वेलर्सतर्फे आयोजित विविध उपक्रमांना ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे आता तिसऱ्या वर्धापनदिनीही कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पीएसबी ज्वेलर्सने २१ ऑक्टोबर ते २६ जानेवारीअखेर सोन्याची दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोटरसायकल, वॉशिंग मशीन, कूलर यासह अनेक वस्तूंचे कूपन वाटप केले आहे. त्या कूपनची सोडत कार्यक्रमात होणार आहे.
           ग्राहकांनी कार्यक्रमास हजर राहून लकी ड्रॉ, आरोग्य तपासणी व सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएसबी ज्वेलर्सचे मालक प्रकाश व चंद्रशेखर शिवप्पा बंडगर यांनी केले आहे
.


Post a Comment

0 Comments