लायन्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा | महिला शिक्षकांचा केला सन्मान


जत /प्रतिनिधी: येथील लायन्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या पाहुण्या म्हणुन सौ मीनाक्षी अक्की उपस्थित होत्या. याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या की, प्रत्येकाने महिलांचा आदर करावा. तिला योग्य सन्मान द्यावा. कुटूंबात व कुटुंबाबाहेरसुद्धा सन्मानने वागवले पाहिजे. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जत पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक जयश्री गायकवाड उपस्थित होत्या. उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, समाजात महिलांना दुय्यम स्थान न देता सन्मानाने वागवले पाहिजे. यावेळी त्यांनी निर्भया पथकाचे काम व महिला दिनाचे महत्त्वही समजून सांगितले. 
           याप्रसंगी शाळेमधील महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्राचार्या विद्या सावंत, मुख्याध्यापिका गीता राठोड, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, त्याचबरोबर शाळेचे ऍडमिनिस्ट्रेटर डॉ. विद्याधर कीट्टद, राजेंद्र अराळी, रामानंद तंगडी, किरण पाटील, सावित्री कोळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक गीता राठोड यांनी केले, सुत्रसंचलन श्रावणी पाटील व सुरभी स्वामी यांनी तर विद्या सावंत यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments