जत सोसायटीच्या अध्यक्षपदी मोहन (भैय्या) कुलकर्णी यांची वर्णी

तर उपाध्यक्षपदी हुवाण्णा माळी

जत/प्रतिनिधी : जत विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक ही मोठ्या चुरशीची झाली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप युतीने बाजी मारत एकहाती सत्ता काबीज केली. जत सोसायटीच्या निवडणुकीत किंगमेकर ठरलेले माजी नगरसेवक मोहन उर्फ भैय्या कुलकर्णी यांची अध्यक्षपदी तर, उपाध्यक्षपदी हुवाण्णा माळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
          सोसायटीच्या नूतन संचालकांची सोमवारी बैठक झाली. यावेळी बोलताना भैय्या कुलकर्णी म्हणाले कर्जात अडकलेली जत सोसायटी कर्जमुक्त करण्याचा आमचा मानस आहे. शेतीसंबंधित विविध योजनाचा लाभ शेतकरी वर्गापर्यंत पोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार.
           यावेळी नूतन संचालक आप्पासो पवार, स्वप्नील शिंदे, अचकनहळ्ळीचे माजी सरपंच प्रमोद सावंत, अजित शिंदे, बसाप्पा बेडगे, विठ्ठल पवार, हनुमंत गडदे, मनोहर सावंत, झुलेखा मोहिद्दिन नदाफ, सुशीला शिंदे, हुवाण्णा माळी, प्रकाश देवकुळे हे सर्व संचालक उपस्थित होते. यावेळी निवडीनंतर भैय्या कुलकर्णी व उपाध्यक्ष हुवाण्णा माळी यांचा सत्कार माजी सभापती सुरेश शिंदे, मुचंडीचे सरपंच अशोक पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक मन्सूर खतीब, प्रकाश व्हनमाने आदी उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments