मराठी भाषेचा गौरव व्हावा: डॉ. विद्याधर किट्टद

ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा- जत व जत आगार यांच्या संयुक्त विद्यमाने जत बसस्थानकात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा


जत/प्रतिनिधी: मराठी भाषेला महानुभव पंथापासून ते अगदी अलिकडच्या मोबाईल युगापर्यंत असा एक दीर्घ वारसा लाभला आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० मध्ये कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून नमूद करण्यात आला आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र सरकारने घेतला. याच दिवसाला मराठी राजभाषा दिन असेही म्हणतात. अशा भाषेचा गौरव व्हावा, असे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे पुणे विभागीय उपाध्यक्ष डॉ. विद्याधर किट्टद यांनी व्यक्त केले. ते ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा जत व जत बस आगार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 
          यावेळी जत आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक तेजस बुचडे, सहायक वाहतूक अधीक्षक बालाजी गायकवाड, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे इब्राहिम नदाफ, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा जतचे सहसचिव प्रा. तुकाराम सन्नके,  वाहक, चालक, कर्मचारी व प्रवासी आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी गायकवाड तर आभार प्रा. तुकाराम सन्नके यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments