विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्यावे: डॉ. संजय लठ्ठेजत/प्रतिनिधी: व्यक्तीचा शारिरीक, मानसिक, भावनिक व सामाजिक विकास होत असतो. या विकासातून तिचा पिंड घडत असतो. व्यक्तिचा हा घडलेला पिंड म्हणजे व्यक्तिमत्व विकास होय. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत डॉ. संजय लठ्ठे यांनी व्यक्त केले. ते मौजे बनाळी, ता. जत येथे राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित प्रबोधन कार्यक्रमांमध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत बनाळीचे सदस्य संतोष जगताप व विनोद जगताप उपस्थित होते. 
         आपले मनोगत व्यक्त करताना विनोद जगताप म्हणाले की, बनाळी येथील बनशंकरी देवीच्या बनामध्ये महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग अतिशय सुंदर पद्धतीने काम करत आहे. अध्यक्षीय भाषणात संतोष जगताप म्हणाले की, व्यक्तिमत्व विकास ही काळाची गरज असून महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासाची मुल्ये आपल्या अंगी रुजवली पाहिजेत.
         या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विजय जाधव, पुंडलीक चौधरी, तुकाराम सन्नके,  समितीतील सर्व सदस्य, शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक, स्वयंसेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कविता ठवरे यांनी, सूत्रसंचालन शुभांगी माने तर आभार राकेश किरणगी यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments