पशुधन शेतक-यानी सेंद्रिय शेतीसाठी पुढाकार घ्यावा; डाॅ. अमृतानंद स्वामीजी


जत/प्रतिनिधी:- गुरूदेव आश्रम बालगावचे मठाधिपती डाॅ. अमृतानंद स्वामीजी यांच्याकडून  खलाटी येथिल सज्जन शिंदे यांच्या गो आधारीत सेंद्रिय शेती प्रकल्पाची पहाणी करण्यात आली. पशुधन शेतक-यानी सेंद्रिय शेतीसाठी पुढाकार घेण्याचे केले आवाहन. 
            जत तालुक्यातील बालगाव येथिल गुरूदेव आश्रम चे मठाधिपती डाॅ. अमृतानंद स्वामीजी यांना गो आधारीत सेंद्रिय शेतीची मोठी आवड आहे. त्यानी बालगाव येथिल गुरूदेव आश्रमात शेकडो देशी गाई चे पालन पोषण सुरू केले आहे. या देशी गाई पासून मिळणारे  दूध ,गो- मुत्र ,शेण यापासून त्यानी विविध प्रकारचे उपक्रम राबविले आहेत. नुकतेच त्यानी खलाटी येथील शेतकरी सज्जन शिंदे यांच्या गो आधारीत सेंद्रिय शेती प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पाची पहाणी केली. 
           शिंदे यानी खलाटी येथे डोंगर भागात असलेल्या पाच एकर जमिनीवर गो-आधारीत सेंद्रिय शेती केली असून त्यानी या शेतामध्ये रासायनिक मुक्त शेती फार्मुला वापरून तो यशस्वीही करून दाखवला आहे. सेंद्रिय पध्दतीने शेती करत या पाच एकर जमिनिवर पेरू, फ्लावर, बिट, ऊस, केळी व विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे चांगल्या प्रकारे उत्पादन घेतले आहे. या सर्व पिकांसाठी विषमुक्त पध्दतीने टिकून राहण्यासाठी संपूर्ण गो-आधारीत जिवामृत तयार करून त्याचा वापर खत म्हणून करून पिकांना दिले आहे. व चांगले उत्पादन घेतले आहे. 
          डाॅ. अमृतानंद स्वामीजी यानी या संपूर्ण प्रकल्पाची पहाणी करून समाधान व्यक्त केले व त्यानी उपस्थित शेतकरी व पशुधन मालकांना आवाहन केले  की, कोणीही या पुढे आपल्या शेतामध्ये रासायनिक खतांचा वापर करून पिके घेऊ नका, प्रत्येकाने गो- आधारीत सेंद्रिय शेती चा उपयोग आपल्या शेतामध्ये करून चांगल्या प्रकारे उत्पादन करावे असे आवाहन ही केले. व यापुढील काळात जर कोणाला गो-आधारीत सेंद्रिय शेतीसाठी जी काही मदत लागेल ती करण्याचे अश्वासन दिले. 
          यावेळी खलाटी व परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानी आपल्या शेतात पिकवलेली फळे, भाजीपाला व गूळ देऊन स्वामीजींचा आदर सत्कार केला.

Post a Comment

0 Comments