जत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यासाठी मी कठीबध्द असून गावागावात विविध योजनातून पाणी योजना मंजूर केल्या आहेत. तसेच शासनाकडून मोठया प्रमाणात निधी खेचून आणला आहे. त्यामुळे या योजना पुर्ण झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, असा विश्वास आमदार विक्रमसिंह सांवत यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील मेंढीगीरी येथे जल जीवन मिशन 88 लाख, 30 हजार, 434 रुपये मंजूर निधीच्या नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन सोहळा आमदार विक्रमसिंह सावंत,यांच्या शुभहस्ते झाला. त्यावेळी आ. सांवत बोलत होते.
यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष आप्पाराय बिराजदार, माजी पं स सभापती बाबासाहेब तात्या कोडग, जि.प. सदस्य महादेव पाटील, उपअभियंता ग्रा.पा.पु,उपविभाग पं स जतचे प्रसाद काटकर, माजी सरपंच प्रकाश पाटील, माजी सरपंच सुभाष बिराजदार,उपसरपंच अजित कांबळे, ग्रा.प.सदस्य भीमराय बिराजदार, सदाशिव ऐवळे, अनिल करके,माजी उपसरपंच सुरेश व्हनवाडे, प्रकाश वाघमोडे, श्रीशैल शिवंगशी, यल्लवा कांबळे, इतर ग्रामस्त उपस्थित होते.
0 Comments