विक्रम फाऊंडेशन आयोजित खास व केवळ महिलांसाठी भव्य रंगपंचमी महोत्सव: सौ.वर्षाताई विक्रमसिंह सावंत व सौ.मिनलदीदी सावंत-पाटील


जत/प्रतिनिधी:- विक्रम फाऊंडेशन आयोजित खास व केवळ महिलांसाठी भव्य रंगपंचमी महोत्सव भारती विद्यापीठ, महिलांचे वसतिगृह जत येथे आयोजित केल्याची माहिती संयोजिका सौ.वर्षाताई विक्रमदादा सावंत व सौ मिनलदीदी सावंत-पाटील यांनी दिली.
          दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विक्रम फाउंडेशन, जत यांच्या वतीने केवळ महिलांसाठी मंगळवार दि.२२/२/२००२२ रोजी भव्य रंगपंचमी महोत्सवाचे आयोजन सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत  करण्यात आले आहे. रंगपंचमी महोत्सवाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
          भन्नाट फनी गेम्स, आकर्षक स्पॉट गिफ्ट, स्थानिक कलाकारांचे निवडक नृत्याविष्कार, कराओके साऊंड ट्रॅक वरील गाणी, भरपूर ओले व सुके रंग, मुबलक पाणी उपलब्ध केले जाणार आहे. तसेच दणदणीत आवाजाची डि.जे. साऊंड सिस्टिम व इतर सर्व व्यवस्था केली जाणार आहे. तरी महिलांनी या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन संयोजिका सौ.वर्षाताई विक्रमदादा सावंत व सौ. मिनलदीदी सावंत-पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments