जाडरबोबलाद ता.जत येथील तिघांवर तलवार हल्ला | मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे घडली घटना


जत/प्रतिनिधी:- जाडरबोबलाद ता.जत येथील तिघे जण नातेवाईकवर अंत्यसंस्कार करून गावी परतत असताना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर जवळ अज्ञात व्यक्तीनि जबर तलवार हल्ला केला आहे. या हल्ल्यात जाडरबोबलाद येथील तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यात एकाचा हातच बाजूला निघाला आहे.
          याबाबतची अधिक माहिती अशी जत तालुक्यातील जाडरबोबलाद येथील विठ्ठल रामचंद्र बरुर, महादेव रामचंद्र बरूर व दयानंद मल्लेश बरूर हे तिघे मोटारसायकलने नातेवाईक वारल्याने नंदेश्वरकडे त्याच्या अंत्यसंस्काराला गेले होते. अंत्यसंस्कार आटोपून रविवारी रात्री सात वाजता मोटारसायकलने परत गावी येत असताना नंदेश्वरजवळील फॉरेस्ट जवळ अज्ञात हल्लेखोरांनी या तिघांवर जबर तलवारीने हल्ला केला. हा हल्ला इतका जबर होता की या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले आहेत.
          जखमींना तातडीने जत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून जखमींना तातडीने सांगली येथे हलविण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला पण ग्रामीण रुग्णालय व परिवारात १०८ ही रुग्णवाहिका नव्हती. अखेर जत येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश मोटे यांनी १०२ ही रुग्णवाहिका रुग्णांना उपलब्ध करून दिली.

जबर हल्ला-
अज्ञात हल्लेखोरांनी या तिघांवर जबर हल्ला केला आहे. या हल्ल्यात तिघांच्या हातावर, पायावर, गळयावर वार करण्यात आले आहेत. यात एका जखमीचा हात हा मनगटापासून बाजूला झाल्याचे प्रत्यक्षदर्शनीने सांगितले.

Post a Comment

0 Comments