भागवत काटकर यांना आदर्श पत्रकार रत्न पुरस्कार


जत : जत तालुक्याच्या पत्रकारितेत गेली 20 वर्ष उत्तम कामगिरी करणारे भागवत काटकर(माऊली) यांना ओम साई प्रतिष्ठान शेगावचा पत्रकार रत्न पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. दि. 20 मार्च रोजी त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. काटकर (माऊली)हे मूळचे वळेखिंडी येथील आहेत. 
         जत तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकास वाटा बळकट करण्यात काटकर यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून खूप चांगले काम केले आहे. अतिशय शांत, निस्वार्थी आणि सामाजिक संवेदना बाळगून काम करणारा पत्रकार म्हणून त्यांची विशेष ओळख जत तालुक्यात आहे. साहित्य, शिक्षण, समाजकारण,  राजकारण, सहकार या विषयाचा त्यांना मोठा आभ्यास आहे.  
        जत उत्तर भागातील अनेक महत्वाचे प्रश्न त्यांनी आपल्या सकस लेखणीतून तडीस लावले आहेत. प्रचंड लोकसंग्रह, वाचन, माणसं हाताळण्याची कला, अनेक प्रतिभावंत साहित्यिक, लेखक, नेते, समाजकारणी, शिक्षक, पत्रकार, अधिकारी यांच्याशी त्यांचे नेहमीच घनिष्ठ अन् मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. 
         अशा एका उत्तम बातमीदाराचा गौरव त्यांची जिथून पत्रकारितेची सुरुवात झाली, त्याच भूमीतील माणसांकडून होत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
   
 आमचे सहकारी, मित्र भागवत काटकर(काका) यांचे मनःपूर्वक आभिनंदन व शुभेच्छा..!

Post a Comment

0 Comments