जिल्हा बँकेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक बळ देणारा; प्रकाश जमदाडे


जत/प्रतिनिधी:- जत तालुक्यात हजाराहून अधिक स्वयःसहायता महिला बचत गट नोंदणी असून ५०० गट कार्यरत आहेत. जवळपास १२ हजार महिला एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. गेल्या ३ महिन्यात जवळपास ६९ बचतगटांना ७०.३९ लाख कर्ज वाटप केले आहे. आगामी काळात जिल्हा बँकेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक बळ देणार असल्याची ग्वाही जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी दिली.
         यावेळी तालुक्यातील पच्छापूर, कंठी, शेगाव व बनाळी येथील महिला बचत गटांना मंजुरीचे पत्र  
वाटप जमदाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
          यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, यापुढील कालावधीत महिला बचत गटाचे तालुका फाउंडेशन करून जिल्हा उद्योग केंद्र, महिला बालकल्याण जिल्हा परिषद सांगली, पंचायत समिती व जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या समन्वयाने छोटे-मोठे उद्योग करणाऱ्या महिलांना तांत्रिक मार्गदर्शन व आर्थिक पाठबळ देणार असल्याची ग्वाही दिली. आज प्रत्येक क्षेत्रात महिला सक्षम पणे काम करीत आहेत. त्यांना आर्थिक पाठबळ देण्याची गरज आहे. त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हा चांगला पर्याय आहे.
        यावेळी जिल्हा बँकेचे संचालक मन्सूर खतीब, बँकेचे तालुका अधिकारी आर टी कोळी, तानाजी काशीद, बंडू दुधाळ, बनाळीच्या सरपंच सौ विद्या सावंत, मच्छिंद्र वाघमोडे, पांडुरंग मळगे, अविनाश सावंत व महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. सरपंच सौ विद्याताई सावंत यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments