जतच्या संदेश मोटे याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडजत/प्रतिनिधी:- येथील राजे रामराव महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारा संदेश रामचंद्र मोटे याची अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
संदेश मोटे हा राजे रामराव महाविद्यालयात बीए भाग २ मध्ये शिक्षण घेत आहे. शिवाजी विद्यापीठ अंतर्गत झालेल्या आंतर विभागीय सायकलिंग स्पर्धेत उज्वल यश संपादन केल्यामुळे त्याची अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेमध्ये निवड झाली आहे.
          संदेश मोटे याच्या निवडीमुळे तालुक्याचे व महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकले आहे. त्याला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक डॉ सुरेश पाटील, प्राध्यापक सिताराम चव्हाण सर, प्राध्यापक दीपक कांबळे सर व प्राध्यापक अनुप मुळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Post a Comment

0 Comments