जत तालुका युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडी जाहीर


जत/प्रतिनिधी:- जत येथे जत तालुका युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडी करण्यात आल्या. येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात निवडण्यात आलेल्या सदस्यांना निवडीचे पत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
          यावेळी सांगली जिल्हा युवती राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पूजा लाड म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश अध्यक्ष ना. जयंतराव पाटील  यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक रचनात्मक व संघटनात्मक करुन पक्षाची ध्येय धोरणे, विकासात्मक कामे गांव, वाड्या वस्त्यावर पोहचविण्यासाठी आपण संघटना मजबूत करावी. असे ते यावेळी बोलताना म्हणाल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिताताई जाधव उपस्थित होत्या.
          यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जत तालुकाध्यक्षा पदी कु. अस्मिता सेसावरे, उपाध्यक्ष पदी सिमा साबळे तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्या पदी श्रेयोही बळवंत यांची नियुक्ती करण्यात आली.
          यावेळी महीला जिल्हा उपाध्यक्षा सौ.मीनाक्षीताई आक्की, तालुका अध्यक्ष सौ.गिताताई कोडग, सौ.नयना सोनवणे, जिल्हा प्रतिनिधी सौ.प्रतिभा धनंजय पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मन्सूर भाई खतीब, सुरेश शिंदे सरकार, शिवाजी शिंदे, मच्छिंद्र वाघमोडे, विकास लेंगरे, सागर शिनगारे, इम्रान गवंडी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments