दामदुप्पट पैसे करण्याच्या आमिषाने गोर-गरीब जनतेची लूट; आंदोलनाचा इशारा | मनसे जत शहर उपाध्यक्ष शरद चव्हाण


जत/प्रतिनिधी:- एका वर्षात दाम-दुप्पट रक्कम देण्याच्या अमिषाने गोर गरीबांकडुन बेकायदेशीर मार्गाने गोळा केलेली रक्कम संबधीतांना दोन दिवसात परत न केल्यास पोलीस अधिक्षकसो सांगली यांचे कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल करून संबंधितांवर गुन्हे दाखल करणार असलेबाबतचे अवाहन मनसेचे जत शहर उपाध्यक्ष शरद चव्हाण यांनी केले आहे. 
           यावेळी अधिक बोलताना ते म्हणाले की, जत तालुका दुष्काळाने सतत होरपळत असताना व तालुक्यातील जनता मोल-मजुरी तसेच ऊस तोडणी करुन कुटुंबाचा उदर निर्वाह करीत आहे. अनेक कुटुंबांनी स्वतःच्या पोटाला चिमटा काढुन मुलांचे भविष्याचे दृष्टीने काटकसरीने बचत करुन ठेवलेल्या रक्कमेवर तसेच तालुक्यातील स्वयंघोषीत सावकार यांनी कंपनी स्थापन केल्याचे सांगुन. एक वर्षात रक्कम दुप्पट करुन परत देणार असल्याचे सांगुन गोर गरीबांकडुन लाखो रुपये गोळा केले आहेत. सदरचे कृत्य हे बेकायदेशीर असुन त्यांनी संबंधीतांकडुन गोळा केलेली रक्कम दोन दिवसाचे आत ज्यांच्याकडून गोळा केलेले आहेत. त्यांना संपुर्ण रक्कम परत न केल्यास योग्य त्या पुराव्यांसह मा. पोलीस अधिक्षकसो, सांगली यांचेकडे लेखी तक्रार दाखल करणार आल्याचे शरद चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments