जत येथील तीन विध्यार्थी युद्धभूमी युक्रेन येथून सुखरूप मायदेशी परतले



जत/प्रतिनिधी:- वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले जत तालुक्यातील तीन विद्यार्थी युक्रेन या देशातून सुखरूप मायदेशी परतल्याने पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
           जत तालुक्यातील यश मनोज पाटील (रा. बिळूर), वैष्णवी गणपती शिंदे (रा. तिपेहळळी) व यशराज पराग पवार (रा. जत) हे विद्यार्थी वैद्यकिय शिक्षण घेण्यासाठी युक्रेन येथे गेले होते. परंतु रशिया व युक्रेन मध्ये युध्द सुरू झाल्याने हे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याने त्यांचे पालक चिंतातूर व भयग्रस्त झाले होते.
          परंतु केंद्र व राज्य सरकारने प्रयत्न केल्याने हे विद्यार्थी नुकतेच मायदेशी दिल्ली व पुणे या ठिकाणी परतले असून लवकरच ते आपापल्या गावी पोहचतील. बिळूरचा पाटील हा दिल्लीत उतरला आहे तर वैष्णवी व यशराज हे पुण्यात विमानाने उतरले आहेत. पाल्याचा फोन आल्यानंतर सुखरूप परतल्याने पालकानी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Post a Comment

0 Comments