जागतिक तापमानवाढ व हवामान बदल या मनुष्यापुढील प्रमुख समस्या; डॉ. राजेंद्र लवटे


जत/प्रतिनिधी:- वेगाने होणाऱ्या औद्योगिक क्रांतीमुळे व इंधनाचा प्रचंड वापर वाढल्यामुळे वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून याचा परिणाम जागतिक तापमान वाढ व हवामान बदल यामध्ये होत असून मनुष्याने वेळीच यावर नियंत्रण राखणे गरजेचे असल्याचे मत डॉ. राजेंद्र लवटे यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या निमित्ताने आयोजित श्रमसंस्कार शिबिरामध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी बनाळीच्या माजी सरपंच व अन्नपूर्णा उद्योग समूहाच्या अध्यक्षा सौ. मनीषा जाधव उपस्थित होत्या. 
         आपल्या अध्यक्षीय भाषणात त्या म्हणाल्या की, राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी बनाळी गावाची स्वच्छता करून विविध समाज प्रबोधनपर कार्यक्रम घेऊन आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे. या कार्यक्रमापूर्वी आज बनाळी गावातील स्त्रियांसाठी महाविद्यालयाच्या वतीने हळदी कुंकू व महिला विषयक विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
         या कार्यक्रमाला कार्यक्रम आधिकारी डॉ. विजय जाधव, प्रा. पुंडलिक चौधरी व प्रा. तुकाराम सन्नके, समितीतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बनाळी गावातील ग्रामस्थ व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व स्वयंमसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रकाश माळी, सूत्रसंचालन प्रतीक्षा जाधव तर आभार प्रियांका यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments